वाईट सवयींचा त्‍याग

वाईट सवयींचा त्‍याग

एक व्‍यापारी होता. तो जितका व्‍यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्‍याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्‍ठ होता. त्‍याला सुधारण्‍याचे अनेक प्रयत्‍न निष्‍फळ ठरले. एकदा ही गोष्‍ट त्‍याने एका मित्राला सांगितली. मित्र म्‍हणाला, त्‍याला माझ्याकडे काही दिवस राहण्‍यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन.

त्‍या व्‍यापा-याचा मुलगा मित्राच्‍या घरी राहण्‍यास गेला. त्‍याच्‍या वडिलांच्‍या मित्रांनी त्‍याला अतिशय चांगली वागणूक दिली. एकदा ते त्‍याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्‍याला उपटण्‍यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्‍यानंतर त्‍याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्‍यास सांगितले, मुलाला ते उपटण्‍यास खूप ताकद लावावी लागली. शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्‍यास सांगितला.

मुलाने ते शक्‍य नसल्‍याचे सांगितले. त्‍यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्‍हणजे असा की,' आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्‍हा त्‍यापासून दूर जाणे शक्‍य असते पण मात्र त्‍या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्‍याला त्‍यापासून सुटका करणे अशक्‍य असते. वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्‍य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते.'' मुलाला त्‍याच्‍या मित्रकाकांचा उपदेश सहजपणेलक्षात आला व त्‍याने चांगले वागण्‍याचे ठरवले.

तात्पर्य : वाईट सवयी बाळवण्यापूर्वीच त्यांचे निर्मूलन केले पाहिजे