आरती संग्रह

श्री गणप‍‍तीची आर‍‍ती (सुखकर्ता दुःखकर्ता)
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
जय देव जय देव ।।

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।
जय देव जय देव ।।

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
जय देव जय देव ।।

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको ।।१ ।।

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ ।।

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि ।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ।।२ ।।

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ ।।

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतत संपत सबही भरपूर पावे ।।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ।।३ ।।

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ।। धृ ।।

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥
जय देव जय देव० ॥ ४ ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
जय देव० ।। 2।।

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवळिती राजा विठोबा सावळा।।
जय देव० ।।3।।

ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव०।।4।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती ।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
जय देव० ।।5।।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई हो० ॥ १ ॥

पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई हो० ॥ २ ॥

विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥

अंबऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त तुझा लागतां शंखासुरा वर देसी ॥ १ ॥

रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेता वराह रुप होसी ।
प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥

पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥
सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥
पितृवचना लागीं रामें वनवास केला ।
मिळोनी वानर सेना राजाराम प्रगटला ॥ ५ ॥

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें ।
नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सोडूनी दिधला धर्म म्हणुनी ना दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवि द्यावी निजसुखाआनंद सेवा ॥ ७ ॥

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

आरती ज्ञानराजा।
महाकैवल्यतेजा।
आरती ज्ञानराजा ।
महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत ।
मनु वेधला माझा ॥

लोपलें ज्ञान जगीं ।
त नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग ।
नाम ठेविलें ज्ञानी ॥

कनकांचे ताट करीं ।
उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरु हो ।
साम गायन करी ॥

प्रगट गुह्य बोले ।
विश्व ब्रह्मची केलें ।
रामा जनार्दनीं ।
पायीं ठकचि ठेलें ॥

आरती तुकारामा । स्वामीसद्गुरुधामा ।
सच्चिदानंद मूर्ती । पायी दाखवीं आम्हां || धृ ||
राघवें सागरांत । जैसे पाषाण तारिले ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिले ।
आरती तुकारामा० ।। १ ।।

तुकितां तुलनेसी । ब्रम्ह तुकासी आलें ।
म्हणोनी रामेश्वरें । चरणी मस्तक ठेविलें ।।
आरती तुकारामा ० ।। २ ।।

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥

जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥ ध्रु० ॥

दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥
रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव० ॥ २ ॥

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।।
जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।
मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।।
जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।।
तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।।
कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। आ०।। ४ ।।
आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।। ५ ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।
मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ०।। ६ ।।
इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।। ७ ।।

घालीन लोटांगण वंदीन चरण।।
डोळ्यांनी पाहीन रूप तुझें।।
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन।।
भावें ओवाळीन म्हणे नामा।।
त्वमेव माता च पिता त्वमेव।।
त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव।।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव।।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा।।
बुद्धात्मना व प्रकृतिस्वभावअत्‌।।
करोमि यद्‌त्सकलं परस्मै।।
नारायणायेति समर्पयामि ।।
अच्युतं केशवं रामनारायणं।।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्‌।।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं।।
जानकीनायकं रामचंद्रं भजे।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।।

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।
एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ।।

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो ।
देवा तुजलाची ध्यातो ।
प्रेमें करुनियां देवा,
प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों ।। १ ।।

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ।।

तरी न्यावी सिद्धी देवा हेचि वासना ।
देवा हेचि वासना ।
रक्षूनियां सकळा,
रक्षूनियां सकळा द्यावी आम्हांसी आज्ञा ।। २ ।।

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ।।

मागणें ते देवा आता एकची आहे ।
आता एकची आहे ।
तारुनिया सकळां,
तारुनिया सकळां आम्हा कृपादृष्टी पाहें ।। ३ ।।

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ।।

जेव्हा सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया ।
देवा ऐशा या ठाया ।
प्रेमानंदें लागू ,
प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती वर्णाया ।। ४ ।।

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ।।

सदां ऐसी भक्ती राहों आमुच्या मनी ।
देवा आमुच्या मनी ।
हेचि देवा तुम्हां,
हेचि देवा तुम्हां असे नित्य विनवणी ।।५ ।।

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ।।

वारुनियां संकटें आतां आमुची सारी ।
आता आमुची सारी ।
कृपेची सावली,
कृपेची सावली देवा दीनावरी करीं ।। ६ ।।

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ।।

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी ।
चिंता तुम्हां असावी ।
सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ।। ७ ।।

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ।।

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी ।
आम्हा आज्ञा असावी ।
चुकले आमुचे काहीं,
चुकले आमुचे काहीं त्याची क्षमा असावी ।। ८ ।।

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ।।

सदा सर्वदा..
सदा सर्वदा योग तूझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षू नको गूणवंता अनंता ।
रघूनायका मागणे हेचि आतां ।।

मोरया मोरया..
मोरया मोरया मी बाळ तान्हे ।
तुझीच सेवा करु काय जाणे ।
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वराबा तु घाल पोटी ।।

ज्या ज्या स्थळीं...
ज्या ज्या स्थळीं हे मन जाय माझे ।
त्या त्या स्थळीं हे निज रूप तुझे ।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ।।

कैलासराणा शिवचंद्रमौळी ..
कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ।।

अलंकापुरी ..
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र ।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ।
तया आठविता महापुण्यराशी ।
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ।।

कर्पूरगौरं
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि ।।