श्री शिवपन्चाक्षरस्तोत्र
ॐ (जवळ जवळ प्रत्येक शुद्धमंत्राच्या सुरुवातीला लावला जातो) नमः शिवाय - ही पाच अक्षरे असलेला हा मंत्र नंदी ऋषींनी सिद्ध केला व महादेवास प्रार्थना केली की त्याच्या कृपेचे वहन श्रद्धावानांपर्यंत नंदी ऋषींच्या माध्यमातून होऊदे. आपण जे शिवाचे वाहन नंदी पाहतो ते नंदी ऋषी आहेत. नंदी हे वृषभ रुपात का आहेत ते कुणास ठाऊक असल्यास कृपया इथे लिहावे. खरे तर परमात्म्याला इथून तिथे जायला वाहनाची (जसे आपल्याला कार, रिक्षा, ट्रेन, बसची गरज पडते) गरज नसते. पण त्याची कृपा श्रद्धावानांपर्यंत पोहोचवण्याचे / वहन करण्याचे काम जे जीवात्मा करतात त्यांना त्याचे वाहन म्हणतात. महाशिवरात्रीचा मध्य घेवून आधीचा एक सप्ताह आणि नंतरचा सप्ताह मिळून नंदी पंधरवडा असतो, ज्या दिवसांमधे नंदी ऋषींनी ॐ नमःशिवाय हा मंत्र सिद्ध केला.
ॐनागेन्द्रहाराय त्रिलोचनाय
भस्माङरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय
तस्मै 'न'काराय नमःशिवाय ।। १ ।।
मन्दाकिनीसलिलचन्दनचर्चिताय
नन्दीश्वरप्रमथनाथमहेश्वराय ।
मन्दारपुष्प्बहुपुष्पसुपूजिताय
तस्मै 'म'काराय नमःशिवाय ।। २ ।।
शिवाय गौरीवदनाब्जवृन्द
सूर्याय दक्षाध्वरनाशकाय ।
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय
तस्मै 'शि'काराय नमःशिवाय ।। ३ ।।
वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य
मुनीन्द्रदेवार्चितशेखराय ।
चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय
तस्मै 'व'काराय नमःशिवाय ।। ४ ।।
यक्षस्वरुपाय जटाधराय
पिनाकहस्ताय सनातनाय ।
दिव्याय देवाय दिगम्बराय
तस्मै 'य'काराय नमःशिवाय ।। ५ ।।
पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ।। ६ ।।
इति श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं सम्पुर्णम ।