सर्वसिध्दी मंत्र
प्रत्येक मनुष्यावर ग्रहांचा बरा वाईट परिणाम होतो त्यासाठी त्याच्या निवार्णाथ निरनिराळी यंत्रे, तोडगे सिध्द करून घेणे, त्यांची शांती करणे, त्या साठी दान देणे, इत्यादि उपाय केले जातात. हे उपाय फार वेळ घेणारे व अती खर्चिक असतात. असे न करता त्यासाठी दर दिवशी जपावयाचे मंत्र देत आहे. स़काळी अगर सायंकाळी, स्नान करून हे मंत्र त्या त्या दिवशी १०८ वेळा जपावयाचे आहेत. मंत्र जपताना मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. सकाळी जपण्यासाठी पूर्वेला तोंड करून बसावे व जपावेत. सायंकाळी जपायचे असतील त्यावेळी पश्विमेकडे तोंड करून जपावेत. असे केले असता सर्व बाधा दूर होतात असा अनुमव आहे.
रविवार (सूर्य) : ॐ ह्लीं ह्लीं सूर्याय नमः ।
सोमवार (चंद्र) : ॐ ऐं क्लीं सोमाय नमः ।
मंगळवार ( मंगळ ) : ॐ हूं श्रीं मङगलाय नमः ।
बुधवार (बुध) : ॐ ऐं क्लीं श्रीं बुधाय नमः ।
गुरूवार (गुरु) : ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः ।
शुक्रवार (शुक्र) : ॐ ह्लीं श्रीं शुक्राय नमः ।
शनिवार (शनी) : ॐ ऐं ह्लीं श्रीं शनैश्वराय नमः ।
राहू व केतू यांचा मंत्रजप ही शनिवारी करावा.
राहू : ॐ ऐं ह्लीं राहवे नमः ।
केतु : ॐ ह्लीं केतवे नमः ।